‘ध्यान ही नैसर्गिक सहजावस्था आहे, ही आपल्या सर्वात जवळची अवस्था आहे,’ असे डॉ. संप्रसाद विनोद यांनी म्हटले आहे. या पुस्तकात त्यांनी ध्यानाविषयीचे सर्व समज-गैरसमज दूर केले आहेत. शिवाय ध्यान कसे करावे, ध्यानाचे प्रकार कोणते आदी विषयांवरही मार्गदर्शन केले आहे.
‘जबरदस्तीची एकाग्रता म्हणजे ध्यान नव्हे’, ‘एकाग्रता कशी साधावी’, ‘आंतरिक सुख व बाह्य सुख यातील फरक’, ‘ध्यान कोणाकडे शिकावे’ असा ध्यानाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली आहे.
‘अंतर्दृष्टीची उपयुक्तता’, विकास याबरोबरच दृश्य अभिव्यक्तीची मर्यादा स्पष्ट केली आहे. ‘ध्यान म्हणजे सजग निर्विचारता किंवा जागृत निर्विचारता. मनाची अशी अस्वस्था, की ज्यामध्ये मनातील सर्वच्या सर्व विचार काही काल पूर्णपणे स्तब्ध झालेले असतात’, असे डॉ. विनोद म्हणतात.
या निर्विचारतेसाठी विचारांचा अभ्यासही आवश्यक असतो, असे सांगून ध्यान आनंददायी असावे, असे ते म्हणतात.
प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : २०१
किंमत : १२५ रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)